नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांदा निर्यात बंदी अत्ताच उठवावी, शेतक-यांना हमी भाव द्यावा तसेच अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नाशिक जिल्ह्यात मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन आज दुपारी करण्यात आले.
निर्यातबंदी उठविण्याची वारंवार मागणी होत असतानाही त्याबाबत दखल घेतली जात नसल्याने कांद्याचे भाव दिवसेंदिवस घसरतअसून त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे.
केंद्र सरकारने १५ मार्च रोजी निर्यात बंदी उठविणार असल्याची जाहिर केले असले तरी आत्ताच त्यावर कार्यवाही व्हावी. शेतक-यांना हमी भाव द्यावा तसेच अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.