पुणे : शहरामध्ये २ हजार ६०० पेक्षा जास्त गतिरोधक आहेत. यापैकी फक्त दहा टक्के गतिरोधक पालिका आणि पोलिसांच्या परवानगीने बनवले आहेत. इतर गतिरोधक अशास्त्रीय पध्दतीने तयार करण्यात आले आहे. त्यामुळे गतिरोधकांमुळे वाहनांची गती कमी होण्याऐवजी अपघात होत आहे.
इंडियन कॉंग्रेस रोडच्या नामांकनानुसार शास्त्रीयपध्तीचे गतिरोधक असावे. या नामांकनामध्ये गतिरोधकांची उंची आणि लांबी नमूद केलेली आहे. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारणे बंधनकारक असते.
शहरामधील विविध रस्त्यावर गतीरोधक तयार करण्याची मागणीचे प्रस्ताव या समितीमध्ये सादर केले जातात. त्यानंतर समिती गतिरोधकाबाबत निर्णय घेते. मात्र, गेल्या तीन वर्षामध्ये या समितीच्या बैठका झाल्या नाही. यामुळे गतिरोधकांचे अनेक प्रस्ताव कागदावरच आहे. गतीरोधक तयार करण्यासाठी मान्यता मिळत नसल्याने. राजकीय कार्यकर्ते आणि नागरीक स्वत: अशास्त्रीय पध्दतीने गतिरोधक तयार केले आहे. या अशास्त्रीय गतिरोधकांमुळे दुचाकी स्वरांना पाठ दुखी आणि मणक्याचे आजार होऊ लागले आहेत. तसेच गाडीचे नुकसान होत आहे.
काही ठिकाणी पिवळे आणि काळे रबरी गतिरोधक तयार करण्यात आले आहे. हे रबरी गतिरोधक काही महिन्यामध्ये तुटताय. त्यानंतर रस्त्यावर फक्त नट बोल्ट राहतात. या नटबोल्ट वरून वाहन गेल्यानंतर चाक पक्चंर होतात. गतीरोधकांमुळे अपघात होत आहे.
महापालिकेची गतिरोधक धोरण मार्गदर्शक तत्व समितीच्या बैठका होत नाही. गतिरोधकांबाबत निर्णय घेतले जात नाही. यामुळे या समितीच्या सदस्या कनिझ सुखराणी यांनी या समितीचा राजीनामा दिला आहे.