नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक महोत्सवाचे आयोजन केरळातल्या कोची इथे १६ ते २० मे दरम्यान केले जाणार आहे. काल नवी दिल्ली इथे या संबंधित कार्यक्रम आयोजित केला होता. आयुर्वेदिक वैद्यकीय पर्यटन, ही या महोत्सवाची संकल्पना आहे.
आतापर्यंत जगात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अश्या पद्धतीचा महोत्सव कधीच झाला नव्हता. या महोत्सवात आयुर्वेदातले तज्ज्ञ सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीमुळे २०१४ साली आयुष्यची स्थापना केली गेली. हा महोत्सव या निर्णयाची परिणती आहे, असे केंद्रीय वाणिज्यमंत्री, पियुष गोयल यांनी म्हटले आहे.
या वर्षी नवी दिल्ली इथे आंतरराष्ट्रीय आयुष्य परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणारे आहेत, अशी माहिती आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.