नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : द्रविड मुन्नेत्र कळहम पक्षाचे सरचिटणीस के. अंबळगन् यांचं आज सकाळी चेन्नैत वार्धक्यानं निधन झालं. ते 97वर्षांचे होते. गेली काही वर्षं ते आजारी होते.

तमिळनाडू विधानसभेत ते 9 वेळा निवडून आले होते तसंच करुणानिधी मंत्रिमंडळात त्यानी महत्त्वाची खाती सांभाळली होती. प्राध्यापक के. अंबळगन् यांचं पार्थिव आज त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं असून द्रमुक अध्यक्ष एम. के. स्टालिन, अभिनेता रजनीकांत यांच्यासह अनेक मान्यवरांनी तिथे आदरांजली वाहिली.

मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनी अंबळगन् यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक प्रकट केला आहे.