Kabul: Foreign security personnel and Afghan police arrive at the site of an attack in Kabul, Afghanistan, Friday, March 6, 2020. Gunmen in Afghanistan's capital of Kabul attacked a remembrance ceremony for a minority Shiite leader on Friday, wounding more than a dozen of people, officials said. AP/PTI(AP06-03-2020_000106B)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं काल दहशतवादी हल्ल्यात ३२ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे.

या हल्ल्याचं कारस्थान रचणाऱ्या आणि त्याला पाठबळ देणाऱ्या सर्वांना जागतिक समुदायानं एकजुटीने विरोध करावा आणि त्यांच्याकडे याचा जाब मागावा, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, तसं वेबसाइटवर जाहीर केलं आहे. हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचं अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी  यांनी म्हटलं आहे.

अफगाणिस्तानमधल्या हाजरस या समुदायाचे दिवगंत नेते  शहीद माजारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते.