नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकाँग खुल्या बँडमिटन स्पर्धेत किदंबी श्रीकांतने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिंपिक विजेता चिनी खेळाडू चेन लाँग ने दुखापतीमुळं माघार घेतल्यानं श्रीकांतला पुढे चाल मिळाली.
कालच्या उपांत्यपूर्व सामन्यात श्रीकांतनं त्याच्यावर आघाडी घेतली होती. आज श्रीकांतचा सामना ली चुक यीऊ शी होईल.