नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता आणखी खालावली असून सकाळी अतिशय गंभीर झाली आहे. दिल्लीत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ४१४  इतका नोंदला गेला. सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली परिसरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजना संदर्भात माहिती घेण्यासाठी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली राज्याच्या मुख्यसचिवांना समन्स बजावलं आहे.

याप्रकरणी चारही राज्यांच्या मुख्य सचिवांनी २५ नोव्हेंबर पूर्वी स्वतः न्यायालयासमोर हजर व्हावं, अशी सूचना न्यायालयानं केली आहे. दिल्लीत सम-विषम वाहतूक योजना राबवताना दुचाकी तसंच तीन चाकी वाहनांना सवलत दिली असल्याबद्दलही न्यायालयानं दिल्ली सरकारकडे प्रश्न उपस्थित केला आहे.