नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आर्थिक मदत जाहीर केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी २ हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टरी आठ हजार, तर फळबागांसाठी २ हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या मदतीसह बाधित क्षेत्रातील जमीन महसूलात सवलत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा शुल्कात  सवलत देण्याची घोषणाही राज्यपालांनी केली आहे. ही मदत तातडीनं वितरीत करण्याचे आदेश राज्यपालांनी प्रशासनाला दिले आहेत.