नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विमानतळांवर आणि उड्डाणांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची श्वसनाची तपासणी करण्याआधी सर्दी, खोकला आणि तापाची तपासणी डॉक्टरांमार्फत करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिले आहेत.
अशी लक्षण आढळणाऱ्या कर्मचाऱ्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्वरित रुग्णालयात पाठवले जावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
या महिन्याच्या १३ तारखेपर्यंत हे निर्देश लागू असतील.