**EDS: TV GRAB** New Delhi: Prime Minister Narendra Modi interacts with beneficiaries of Pradhan Mantri Bhartiya Janaushadi Pariyojana via video conferencing, in New Delhi, Saturday, March 7, 2020. (DD News/PTI Photo)(PTI07-03-2020_000017B)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे.

नागरिकांना स्वस्तात उपचार उपलब्ध होण्याच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याबाबत त्यांनी जनतेला आश्वस्त केले. ते काल जनऔषधी दिवसानिमित्त देशभरातल्या जनऔषधी केंद्रांचे लाभधारक आणि केंद्रचालकांशी दूरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे संवाद साधत होते.

या योजनेमुळे  सर्वंच आर्थिक स्तरातल्या नागरिकांना औषधींचा लाभ मिळाला आहे असं ते म्हणाले.

या केंद्रावर बाजारमूल्याच्या तूलनेत ५० ते ९० टक्के कमी किंमतीमध्ये औषधे उपलब्ध होत असल्याचे ते म्हणाले.