नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी प्रकल्पाअंतर्गत देशातल्या प्रत्येक प्रशासकीय गटात या वर्षअखेरीपर्यंत एक केंद्र सुरु करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले.
ते काल जन औषधी दिनानिमित्त जम्मू-काश्मीर मध्ये कथुआ इथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
गरजूंना स्वस्तात औषधं मिळावीत, तसंच जेनरिक औषधांबद्दल नागरिकांमध्ये जागृती यावी म्हणून ही केंद्र सुरु केल्याचे ते म्हणाले.
जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून विकासाला चालना मिळाली आहे असे ते म्हणाले.