गेल्या पाच वर्षांत दोन कोटींपेक्षाही अधिक अल्पसंख्यांक महिलांना विविध योजनांचा लाभ

नवी दिल्ली : केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय अल्पसंख्यांक समुदायातील महिलांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सबलीकरणासाठी विविध योजना राबवत आहे.

मंत्रालयाकडून प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी किमान 80% शैक्षणिक, आरोग्य आणि कौशल्य विकासाची संसाधने आणि किमान 33-40% महिला केंद्रीत प्रकल्पांची तरतूद करण्यात येते.

 

अल्पसंख्यांक महिलांसाठी सामाजिक-आर्थिक सबलीकरण- पूर्व मॅट्रीक शिष्यवृत्ती, मॅट्रीकनंतर शिष्यवृत्ती, गुणवत्ता तथा साधने युक्त शिष्यवृत्ती योजना-विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सबलीकरणासाठी, अल्पसंख्यांक समुदायातील गुणवत्तापूर्ण मुलींसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती आहे. गेल्या पाच वर्षांत 1.94 कोटीहून अधिक मुलींनी याचा लाभ घेतला आहे.

इतर योजनांमध्ये “मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना”; “नया सवेरा – मोफत प्रशिक्षण आणि इतर योजना; “पढो परदेश ” आणि  “नई उडान” या आहेत. नई रोशनी योजनेच्या माध्यमातून नेतृत्व विकास केला जातो. तर, गरीब नवाज रोजगार योजनेच्या माध्यमातून कौशल्य विकास केला जातो.