मुंबई : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘महिला कला महोत्सव – २०२०’ चा आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार शुभारंभ झाला.

या शुभारंभ कार्यक्रमास अभिनेत्री मीना नाईक आणि डॉ. निशिगंधा वाड, नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या हर्षिनी कान्हेकर, प्रकल्प संचालक बिभिषण चवरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या ‘महिला कला महोत्सव- २०२०’ मध्ये दि, १२ मार्चपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शास्त्रीय संगीत, अभिवाचन, भजन, शास्त्रीय नृत्य, नाटक, कविता वाचन, गायन, स्टॅंड अप कॉमेडी, महिलांचे सामूहिक सितार वादन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.