नवी दिल्ली : जीआयएस म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली डॅशबोर्डचा वापर करून आग्रा स्मार्ट सिटीमध्ये कोविड- 19च्या हॉट-स्पॉटसचे निरीक्षण केले जात आहे. या डॅशबोर्डमुळे शहरात कोविड-19चा प्रसार वेगाने होत असलेली स्थानके, हीट मॅप, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या, आजारातून बरे झालेल्यांची संख्या यांची माहिती मिळत आहे. या माहितीचा डॅशबोर्ड दररोज अपडेट केला जात असुन आग्रा शहरात कोविड-19 ची ताजी स्थिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकचा वापर करता येईल: http://covid.sgligis.com/agra
हा डॅशबोर्ड भौगोलिक माहिती प्रणालीचे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून आयजीआयएस ने विकसित केला आहे. यामध्ये छायाचित्रांची प्रक्रिया, फोटोग्रामेटरी- छायाचित्रण आणि सीएडी-कॅड तंत्रज्ञान संयुक्तपणे वापरण्यात आले असून एकाच ठिकाणी विविध प्रकारची माहिती मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे कृषी, संरक्षण, वनीकरण, आपत्ती व्यवस्थापन, खनिजे, ऊर्जा, स्मार्ट सिटी, शहर नियोजन आणि उपयुक्तता, स्थानांच्या आधारे सेवा अशा विविध गोष्टींची माहिती मिळते.
या डॅशबोर्डची काही वैशिष्ट्ये खाली दर्शवण्यात आली आहेत.
हिट मॅपिंग, तारखेनुसार आणि विभागानुसार विश्लेषण, बाधित/ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण