मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मंत्रालयीन कर्मचारी व मंत्रालयात येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रालय परिसरात कोरोना विषाणू निर्जंतुकीकरण अभियान राबविण्यात आले.

आज सकाळी दहा वाजल्यापासून याची सुरुवात मंत्रालयातील मा.मुख्यमंत्री कार्यालय असलेल्या सहाव्या मजल्यापासून ते तळमजल्यापर्यंत करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

या मोहीमेअंतर्गत ज्या-ज्या वस्तूंना लोकांचा स्पर्श होतो, अशा सर्व वस्तू, म्हणजेच पिण्याच्या पाण्याचा कूलर, सरकते जीने, बाथरूम, रेलिंग या सर्व ठिकाणी आर वन, आर टू व डेटॉल या निर्जंतुकाच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात आले.