नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांनी आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आज नोंदवली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज तब्बल १९४२ अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ५३८ अंकांची प्रचंड मोठी घसरण झाली. दोन्ही निर्देशांकांमध्ये ५-५ टक्क्यांची घसरण दिसून आली.

कोरोना विषाणूचा संसर्ग, तेलाच्या किंमतीत झालेली भलीमोठी घसरण, यस बँकघोटाळा आणि जगभरातल्या शेअर बाजारातली घसरण या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.

गेल्या महिनाभरात सेन्सेक्स ५ हजाराहून अधिक अंकांनी कोसळला असून निफ्टीमध्येही १५०० पेक्षा जास्त अंकांची पडझड झाली आहे.