मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या, नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा जवळपास तीप्पट होती. राज्यात काल १५ हजार ६९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. याबरोबरच राज्यातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून ८६ पुर्णांक ४८ शतांश टक्के झालं आहे. आत्तापर्यंत राज्यातले १३ लाख ८४ हजार ८७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

गेले काही दिवस नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कालही कायम राहिली. राज्यात काल दिवसभरात ५ हजार ९८४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख १ हजार ३६५ झाली आहे.

राज्यात काल कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूतही मोठी घट दिसून आली. काल १२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या ४२ हजार २४० झाली आहे. सध्या राज्यातला कोरोना मृत्यूदर २ पूर्णांक ६४ शतांश टक्के इतका आहे.

राज्यभरात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही घट झाली. सध्या राज्या १ लाख ७३ हजार ७५९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.