नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देऊन शेतकऱ्यांची उन्नती साधण्यासाठीच्या २ अध्यादेशांवर आज राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
शेती उत्पादन, व्यापार-वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा ) अध्यादेश आणि हमी भाव, शेती सेवा (सबलीकरण आणि संरक्षण) अध्यादेश या दोन्ही मसुद्यांना नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
कृषि मंत्री नरेन्द्र सिंह तोमर यांनी काल सर्व मंत्र्यांना पत्र लिहून अध्यामदेशांची माहिती दिली असून सहकार्याचं आवाहन केलं आहे.