नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली शंभर कोटी रुपयांची मदत तुटपुंजी असून सरकारनं चक्रीवादळग्रस्तांसाठी संपूर्ण आर्थिक पॅकेज जाहीर करावं अशी मागणी, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. ते आज वार्ताहरांशी बोलत होते.

राज्यात गेल्या वर्षी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत माझ्या सरकारनं, सातारा-सांगली-कोल्हापूर साठी चार हजार सातशे आठ कोटी रुपये, तर नाशिक आणि कोकण साठी 2 हजार 108 रुपयांची मदत केली होती, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. 75 हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज उभारण्याची परवानगी, केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिली असून कर्जाच्या माध्यमातून निधी उभारून, राज्य सरकारनं जनतेला मदत करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.