मुंबई (वृत्तसंस्था) : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज बातमीदरांना ही माहिती दिली. राज्य सरकारनं सात वेळा सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं होत, मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून संप मागे घेत नाहीत. याचा अर्थ या कर्मचाऱ्यांना कामाची गरज नाही, असंही परब म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थी, तसंच इतरांनाही मोठ्या प्रमाणावर त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कत्रांटी कर्मचाऱ्यांना एसटीच्या सेवेत घेतलं जाईल आणि एसटी पूर्णक्षमतेनं कार्यान्वित केली जाईल.  जवळपास ११ हजार नवीन कत्रांटी कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे, असंही ते म्हणाले.