मुंबई (वृत्तसंस्था) : वीज मंडळाच्या अधिकाऱ्याला धमकी देणं आणि अभद्र भाषा वापरणं खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी तसंच वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल डॉ. राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याविषयी सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश औरंगाबादमधल्या महावितरणच्या सह व्यवस्थापकीय संचालकांना दिल्याचं राऊत यांनी सांगितलं.