नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद इथल्या नियोजित स्मृतिवन तसंच स्मारक उभारणीच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
सुमारे सात हेक्टर क्षेत्रावरच्या उद्यानात २५ कोटी ४९ लाख रुपये खर्चून हे स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून औरंगाबाद महापालिकेकडे तर नियंत्रक अधिकारी म्हणून औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला.