नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रंगांची उधळण असलेला होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. चांगल्याची वाईटावर मात आणि वसंत ऋतुचं आगमन या दृष्टीनं या सणाला महत्व आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी जणतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या, कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे खबरदारीचा उपाय म्हणून यंदा राष्ट्रपती भवनात पारंपरिक होळी मिलन कार्यक्रम होणार नाही.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा कोरोना साथीमुळे कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.

कोरोना विषाणुचा प्रसार टाळण्यासाठी गर्दी टाळा, असा सल्ला जगभरातले तज्ञ देत असल्यानं आपण यंदा होळी मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.