नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा संमिश्र परिणाम नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रावर जाणवतो आहे. काही उद्योगांमधून होणारी निर्यात या विषाणूच्या प्रादुर्भावानंतर थांबली आहे. मात्र चिनी कंपन्यांकडून येणारे सुटे भाग आणि इतर साहित्यांची आवक घटल्याने नाशिकच्या उद्योगांना असलेली मागणी वाढली आहे.

देशातल्या बाजारपेठेत चांगली संधी असल्याने नाशिकच्या उद्योगांना यामुळे आपली क्षमता सिद्ध करता येईल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी आकाशवाणीच्या वार्ताहराशी बोलताना दिली आहे.

मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातल्या कुक्कुट पालन व्यवसाय संकटात सापडला आहे. या शिवाय कोंबडी खाद्य असलेल्या मक्याचे भाव कोसळले असून किमान 300 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पोल्ट्री फार्म असोसिएशनच्या सूत्रांनी सांगितले.