नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान आवास योजना एक क्रांतिकारी योजना असून अनेक वर्षांपासून घरकुला पासून वंचित राहिलेल्या समाज घटकातील शेवटच्या घटकांसाठी ही योजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे असं प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलं. श्रीगोंदा नगरपालिकेच्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

मंजूर डीपीआर अंतर्गत घरकुलांच्या निधीसाठी विशेषत: केंद्राच्या वाट्याची पैसे संबंधित पालिकेकडे वर्ग करण्यासाठी केन्द्राकडे पाठपुरावा करू, असं आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.  यावेळी विखे यांनी शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा, मुख्यत्वे घरकुल योजनेचा आढावा घेतला.