नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते.
सतरा राज्यांमधून राज्यसभेवर निवडून जाणा-या ५५ जागांसाठी येत्या २६ तारखेला निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातून सात, तर तामिळनाडूमधून सहाजण राज्यसभेवर जाणार आहेत. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी पाच, तर ओदिशा, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी चार जागा रिक्त आहेत.