नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. येत्या २६ मार्च रोजी राज्यसभा निवडणूक होत आहे. माजी केंद्रीय मंत्री पवार यांनी आज विधानभवन संकुलात अर्ज भरला तेव्हा त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.

माजी मंत्री फौजिया खान आज अर्ज भरण्याची शक्यता होती. पण त्या उद्या अर्ज दाखल करतील. १३ मार्च पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे.

भाजप पुरस्कृत संजय काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजिद मेमन यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत  २ एप्रिलला संपत आहे.