नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुदूचेरीच्या नायब राज्यपालांना तिथल्या सरकारच्या दैनंदिन कामात हस्तक्षेप करण्यास मनाई करणाऱ्या पुदूचेरी न्यायालयाचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठानं रद्दबादल ठरवला आहे.  या बरोबरच न्यायालयाने नायब राज्यपाल किरण बेदी आणि मुख्यमंत्री नारायण सामी यांना एकत्र येऊन काम करायला सांगितले आहे.

पुदूचेरीच्या एका आमदाराने केंद्र सरकारच्या नायब राज्यपालांना जादा अधिकार देण्याच्या निर्णयावर न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनवाई करतांना न्यायमुर्ती महादेवन यांनी नायब राज्यपालांना सरकारच्या दैनंदिन कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असा निर्णय दिला होता. यावर नायब राज्यपाल आणि केंद्र सरकारने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यावर सुनावणी करतांना न्यायमुर्ती एपी साही यांनी हे आदेश दिले. गेल्या काही दिवसांपासून नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये कार्यपद्धतीवरून तणाव सुरू होता. नायब राज्यपालांनी केवळ सरकारच्या शिफारशीनुसार काम करावे असे दावा दाखल केलेल्या पक्षाचे म्हणणे होते.