नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ संकटामुळे श्रीलंकेने सर्व परदेशी नागरिकांना देण्यात येणारा आगमन व्हिसा रद्द केला आहे. याआधी श्रीलंकेने चीनमधून आलेल्या पर्यटकांचा व्हिसा रद्द केला होता.

चीनमधून आलेल्या एका व्यक्तीमुळे श्रीलंकेत पहिल्या कोरोना रूग्णाची नोंद झाली होती. श्रीलंका अनेक देशांना आगमन व्हिसा देत असते त्याचप्रमाणे ४८ देशांना मुक्त व्हिसा देण्यात येतो.