नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूनं अमेरिकेच्या बिवीन झँग हिचा २१-१४ आणि २१-१७ अशा गुण फंरकानं पराभव केला.

पुरुषाच्या एकेरित मात्र भारताच्या किदंवी श्रीकांतला पराभवाचा सामना करावा लागला. त्याला चीनच्या खेळाडूकडून १५-२१, १६-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. सिंधूचा पुढचा सामना कोरियाच्या सुंग जी हयून हिच्याशी होणार आहे.