नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पबजी सारख्या ऑनलाईन खेळामुळे लहानमुलांवर विपरीत परिणाम होतात का? या बाबत मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय वैद्यकीय परिषदेचे मत मागवले आहे. हंगामी मुख्य न्यायाधीश बी.पी. धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने परिषदेला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करायचे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारकडे याबाबत कसलाही तपशील नसल्यामुळे खडपीठाने परिषदेला निर्देश दिले आहेत. ११ वर्षीय मुलाने या खेळावर बंदी घालण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान खंडपीठाने वरील निर्देश दिले. खेळांसंदर्भात केंद्र सरकारने आचारसंहिता तयार करावी, अशी मागणी देखील या याचिकेत केली आहे.