नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधली सद्य परिस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी तिथे जाण्याचं टाळावं, असं आवाहन सरकारनं केलं आहे. इराकमधे कार्यरत भारतीय नागरिकांनी सतर्क रहावं, आणि त्या देशांतर्गत प्रवास टाळावा, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवासाविषयक सल्ला पत्रकात म्हटलं आहे.
बगदाद इथं कार्यरत भारतीय वकीलात आणि इरबिलमधला दूतावास हे तिथल्या भारतीय नागरिकांना सेवा पुरवण्यासाठी कार्यरत असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.