नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या साथी विरोधात योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी साथीचा रोग नियंत्रण कायदा १९९७ चं कलम २ लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सचिव संजीव कुमार यांनी सागितले आहे. यामुळे राज्यांनाही या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे सोयीस्कर होईल असेही ते म्हणाले.

काल झालेल्या मंत्रालय सचिव, संबंधितमंत्रालय, लष्कराचे प्रतिनिधी तसचे भारत – तिबेट सीमा पोलीस दलाच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मंत्रीगटाच्या समितीनं विविध प्रतिबंधात्मक उपायांवर विचार विनिमय केला त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या कामावर समाधान व्यक्त केले असेही ते म्हणाले.

चीन, हाँगकाँग, दक्षिण कोरीया, जपान, इटली, थायलंड, सिंगापोर, इराण, मलेशिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी मधून आलेल्या प्रवाशांना १४ दिवस स्वनिरिक्षणात राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असून अशा लोकांच्या आस्थापनांना त्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्याची विनंती आरोग्य मंत्रालयाने केली आहे.