नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचा मुख्य कार्यक्रम यावर्षी लडाखची राजधानी लेहमध्ये होणार आहे. २१ जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असेल.

आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. हा कार्यक्रम विषेश आणि उल्लेखनीय असेल असेही ते म्हणाले.