नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवासामुळे अथवा त्या व्यतिरिक्त लागण झालेल्यांना सुयोग्य वैद्यकीय वातावरणात तातडीचं विलगीकरण अनिवार्य असून स्वतंत्र शौचालय तसचं वायुविजनाची सोय असलेल्या वेगळ्या खोलीमध्ये ठेवावं. या खोलीत कुटुंबातल्या दूसऱ्या सदस्याला राहावं लागल्यास किमान एक मिटरचं अंतर ठेवावं.

बाधित रूग्णानं ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, लहान मुलं यांच्याशी संपर्क ठेऊ नये. तसंच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला जाऊ नये. अशा व्यक्तीनं आपले हात वारंवार साबण आणि पाण्यानं धूवावेत तसचं अल्कोहोल युक्त सॅनिटायझर वापरावेत. अशा व्यक्तीनं सर्जिकल मास्क वापरावेत आणि दर सहा ते आठ तासांनी ते नष्ट करावेत.

जर कुणाला खोकला, ताप, श्वसनात अडचण अशी लक्षणं आढळली तर त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रावर संपर्क साधावा किंवा ०११२३९७८०४६ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. घरातल्या विलगीकरणाचा कालावधी १४ दिवसांचा आहे, असंही या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.