नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया निधीचा उपयोग करुन देशातल्या सर्व जिल्ह्यात मानवी तस्करी प्रतिबंधक केंद्र आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मदत केंद्र स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटवरुन जाहीर केला आहे.

महिलांमधे सुरक्षेची भावना बिंबवून महिला सुरक्षेचं बळकटीकरण करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर केंद्र सरकारनं २०१३ साली निर्भया निधीची स्थापना केली होती.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्था आणि केंद्र सरकारच्या उपक्रमांसाठी हा निधी सहाय्यकारी ठरतो.