नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या गोव्यात या महिन्यात होणार असलेल्या सुवर्ण महोत्सवात ज्येष्ठ कलाकार रजनीकांत यांना विशेष प्रतिमा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत इथं ही माहिती दिली.
गेल्या अनेक दशकातल्या रंजनीकांत यांच्या चित्रपट क्षेत्रातल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. फ्रेंच अभिनेत्री ईसाबेल ह्युपर्ट यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवलं जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
या चित्रपट महोत्सवात महिला दिग्दर्शकांचे ५० चित्रपट दाखवले जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.