नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझव्र्ह बँकेनं चार सहकारी बँकांची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पैसे काढण्यावर निर्बंध लादले आहेत. या चार बँकांमध्ये महाराष्ट्रातील साईबाबा जनता सहकारी बँक, द सूरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड,सूरी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील दोन बँका, युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बिजनौर आणि नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बहराइच यांचा समावेश आहे.
साईबाबा जनता सहकारी बँकेचे ठेवीदार २० हजार रुपये तर द सूरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँकेचे ठेवीदार ५० हजारापेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाहीत. नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बाबतीत, पैसे काढण्याची मर्यादा प्रति ग्राहक १० हजार रुपये ठेवण्यात आली असून युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बिजनौरवर पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, १९४९ अंतर्गत या चार सहकारी बँकांना आरबीआयने जारी केलेले निर्देश सहा महिन्यांसाठी लागू राहतील.