नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद या भारतमातेच्या दोन महान सुपुत्रांना वंदन केलं. एका ट्विटमध्ये मोदी यांनी म्हटलं आहे की या दोन महान व्यक्तिमत्त्वांमध्ये धाडस आणि राष्ट्रभक्ती एकवटली होती.

प्रधानमंत्र्यांनी काही वर्षांपूर्वी मन की बात या कार्यक्रमाद्वारे लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या बद्दल व्यक्त केलेले काही अनुभवांच पुन्हा एकदा स्मरण केलं. लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाच्या आयोजनाची सुरुवात केली सुरुवात केल्याने लोकांमध्ये सांस्कृतिक प्रेरणा वाढीला लागल्याचं मोदी यांनी सांगितलं.

लोकमान्य टिळकांशी  संबंधित असलेल्या लोकमान्य सेवा संघ इथं आपल्या मुंबई यात्रेदरम्यान जाण्याची संधी आपल्याला एकदा मिळाल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असं सांगत लोकमान्य टिळक यांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य आणि स्वराज्य यांचा हुंकार भरला. त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.