मुंबई (वृत्तसंस्था) : खटुआ समितीच्या शिफारसीनुसार ऑटो रिक्षा साठी हॅपी अवर या संकल्पनेच्या अंमलबजावणीला, राज्य सरकारनं मान्यता दिली आहे.
हॅपी अवर या संकल्पनेनुसार दुपारी १२ ते ४ या वेळेत, प्रवाशांना रिक्षाच्या भाड्यात पंधरा टक्के सवलत मिळेल, असं शासन आदेशात म्हटलं आहे. स्थानिक टॅक्सी आणि अॅप आधारित टॅक्सींसाठी मात्र हा निर्णय लागू नसेल.
या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असला तरी ऑटो रिक्षा संघटनांनी मात्र या निर्णयाला विरोध करण्याचे संकेत दिले आहेत.