मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मुदत संपणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तत्काळ तयार करा असे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं महापालिका आयुक्तांना दिले आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, वसई विरार, पनवेल मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, औरंगाबाद, नांदेड वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर  महापालिकांसंदर्भात ३० सप्टेंबरला या संदर्भातला अध्यादेश जारी झाला आहे. या महानगरपालिकांच्या निवडणुका मुदत संपण्यापूर्वी तिथं निवडणुका घेणं बंधनकारक आहे. त्यासाठी मतदारयाद्या तयार करण्याची जबाबदारी  निवडणूक आयोगाची आहे.