नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनच्या रामायण मालिकेत रावणाची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद त्रिवेदी यांचं आज निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. विक्रम आणि वेताळमधल्या त्यांच्या भूमिकेनंही चाहत्यांच्या मनात वेगळं स्तान निर्माण केलं. त्रिवेदी यांनी हिंदी आणि गुजराती चित्रपटांसह सुमारे ३०० चित्रपटांमध्ये काम केलं होतं.