नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या २९ तारखेला सुरु होणा-या आयपीएल क्रिकेट स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.

कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्यामुळे स्पर्धेत सहभागी खेळाडू आणि येणा-या प्रेक्षकांच्या आरोग्याचा विचार करुन सावधानता बाळगण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.