नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुपासून बचावासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वारंवार करत आहे.
लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, जर तुम्हाला खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा, हात धुतल्याशिवाय डोळे, नाक आणि तोंड यांना स्पर्श करु नये. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. साबणाने आणि पाण्याने हात सारखे धुवा किंवा त्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटाइझरचा वापर करावा.
शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड, रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. वापरानंतर लगेचच टिश्यूपेपर केराच्या बंद टोपलीत टाका. ताप असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि खोकला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांकडे जाताना तोंड आणि नाक मास्क किंवा कापडाने बंद करा.
सरकारने २४ तास उपलब्ध असलेला १०४ हा मदत क्रमांक जारी केला आहे. तसेच ०११ – २३९ – ७८० – ४६, या क्रमांकावर तुम्ही संपर्क करु शकता.
मुंबई महानगर पालिकेने १९१६ हा मदत क्रमांक जारी केला आहे. तसेच ncov2019@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधता येईल.