नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने चेहऱ्यावर लावायचे मास्क आणि सॅनीटायझरचा समावेश, येत्या ३० जूनपर्यंत जीवनावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. त्यांची साठेबाजी आणि काळाबाजार रोखावा तसेच त्यांचे उत्पादन आणि पुरवठा वाढावा या हेतूने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने काल यासंदर्भातली अधिसूचना जारी केली.
मास्क, हातमोजे, आणि सॅनीटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावेत, तसेच त्यांच्या किंमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे.