नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा परिषदेची ३९ वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या तर अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.