नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी उद्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडावा, आणि बहुमत सिद्ध करावे असे निर्देश राज्यपाल लालजी टंडन यांनी दिले आहेत.
विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून, सुरुवातीला राज्यपालांचं अभिभाषण होईल.
काँग्रेसच्या २२ आमदारांनी दिलेले राजीनामे स्वीकारण्यात आल्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले असून, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असं भाजपा नेते शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले.
चौहान यांच्या नेतृत्वाखाली गोपाल भार्गव, नरोत्तम मिश्रा आणि भूपेंद्र सिंग यांच्या शिष्टमंडळाने काल राज्यपालांची भेट घेऊन, बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश सरकारला देण्याची मागणी केली.
दरम्यान, विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी आमदारांनी अधिवेशनाला उपस्थित रहावे, असा पक्षादेश काँग्रेसने काढला आहे.