नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाचव्या द्वैवार्षिक आंतरसरकार परिषदेसाठी जर्मनीच्या अध्यक्षा अँजेला मर्केल काल संध्याकाळी तीन दिवसाच्या भारत भेटीवर आल्या आहेत. या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद मोदी आणि मर्केल संयुक्त अध्यक्षपदी राहणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद मोदी आणि मर्केल यांच्यात आर्थिक भागीदारी, व्यापार, गुंतवणूक आणि कृषी क्षेत्र आदी विषयांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे. मर्केल यांच्या सोबत त्यांच्या सरकारमधील अनेक मंत्री आणि सचिव तसच मोठे उद्योगपती देखील आले आहेत, अशी माहिती परराष्ट्रीय व्यवहार सचिव रवीश कुमार यांनी वार्ताहरांना दिली.