नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या उद्रेकाशी सामना करताना महाराष्ट्र सरकारच्या तयारी संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नावर चर्चा झाली.
आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती यावेळी ठाकरे यांनी प्रधानमंत्र्यांना दिली. महाराष्ट्र सरकारने अगोदरच १८९७चा साथीचे आजार कायदा लागू केला असून याद्वारे उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना व्यापक अधिकार बहाल केले आहेत.