नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरच्या विकासासाठी लोकांचा सहभाग गरजेचा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अपनी पार्टीचे प्रमुख अल्ताफ बुखारी यांच्या नेतृत्वाखालील २४ सदस्यीय शिष्टमंडळाबरोबर काल नवी दिल्ली इथं ते बोलत होते. राजकीय एकात्मतेच्या माध्यमातून जम्मू-कश्मीरमध्ये लोकशाही बळकट होईल, असंही ते म्हणाले.
या भागात पायाभूत सुविधा मजबूत करून आर्थिक विकास करण्यासाठी, तसंच या भागातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. जम्मू-कश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांचं या शिष्टमंडळानं कौतुक केलं.